Posts

भिती

उंबरठा हा शब्द प्रत्यक्ष रचना तर दर्शवतोच, आपण त्याला एक संकल्पनचे स्वरूपही दिले आहे. पूर्वी  आपल्या घरांमध्ये  दोन खोल्यांमधील दरवाजाच्या किंवा घरात शिरण्याच्या मुख्य दरवाज्याच्या चौकटींच्या खाली, अगदी कमी उंचीचा असा हा उंबरठा बनलेला असे. आताच्या घरांच्या रचनेतून तसा हा हद्दपार झाला आहे. पण पूर्वीच्या घरांमध्ये ह्या उंबरठ्याची नक्की भूमिका काय असेल हा विचार मनात आला आणि मी नव्याने त्यांच्याकडे बघू लागलो. घरात वावर करताना, या खोलीतून त्या खोलीत जाताना मध्ये अडखळ्यासारखे व्हायला हवे म्हणून तो होता. घराबाहेर पडताना उंबरठा ओलांडून जाणे म्हणजे आतील मोहाचे काही बंध बाजूला करून/ दूर सारून आपल्या कर्तव्यासाठी बाहेर पडणे या अर्थाने तो होता. घरातील रांगते बाळ आपल्या नजरेचा टप्पा सहजपणे ओलांडून जाऊ नये म्हणून तो होता. घरातील सांडलवंड फारशी इकडे-तिकडे पसरू नये, म्हणून तो होता. दोन खोल्यांमधील ती विभागणी होती किंवा घरातले व घराबाहेरचे ह्यांच्यामधील ती विभागणी होती असेही आपण म्हणू शकतो. पण रचनेच्या दृष्टीने तो कमी उंचीचा असणे महत्त्वाचे होते. स्त्रीमुक्तिच्या संदर्भात उंबरठ्याच्या संकल्पनेला

संघर्षातील आनंद

“ जीवनात संघर्षाचे स्थान काय ?”  अधिरथाने मेघराजला विचारले . “ जीवनात सुखाचे ,  समाधानाचे ,  समृद्धीचे जे स्थान ,  तेच स्थान संघर्षाचे असते .”  मेघराज शांतपणे उद्गारला . “ परंतु मानव सुखा - समाधानाला ,  समृद्धीला घाबरत नाही .  उलट त्याने मानवाचा आनंद वाढतो .  संघर्षाचे भय वाटते .  संघर्ष आनंद देत नाही .  मग ह्या सगळ्यांचे स्थान सारखे कसे ?”  अधिरथाने आपली शंका मेघराजासमोर मांडली . “ कोण म्हणतं सुखा - समाधानामुळे किंवा समृद्धीमुळे मानवाचा आनंद वाढतो ?  किंवा संघर्ष दुःखाला जन्म देतो ..”  मेघराजने प्रतिप्रश्न केला . अधिरथ संभ्रमात पडला .  सुखामुळे ,  समृद्धीमुळे आनंद न वाढता दुःख ,  निराशा ह्या भावनांनी ग्रासलेला मानव त्याला आजवर भेटला नव्हता .  सुख - समाधान कोणाला नको असते ?  ते मिळाल्यावर आनंदच होणार .  संघर्ष ह्या शब्दातच घर्षण आहे ..  ते दुखावणारच .  संघर्ष आनंद कसा देईल ?  परंतु मेघराज म्हणत आहे म्हणजे त्यात काहीतरी अर्थ असणारच .  कसा जाणावा तो ?  अधिरथाची संभ्रमावस्था मेघराजाने त्वरित जाणली .  मेघराजाने दीर्घ श्वास घेत अधिरथाला उद्देशून बोलायला सुरुवात केली .  मेघराजने आपल

आहे रे, नाही रे

शाळेत असताना सुट्टीची घंटा वाजली की खूप खूप आनंद व्हायचा ! कॉलेजमध्ये गणिताचा तास चुकवून मित्र - मैत्रिणींबरोबर समोसा खाताना आणि चहाचे भुरके मारताना खूप खूप आनंद व्हायचा ! पुस्तक वाचत असता एखाद्या ओळीवर डोळे थबकायचे , गाणे ऐकत असता एखादी तान कानात साठवून ठेवावीशी वाटायची , सिनेमा बघत असता नायकाच्या नाचाच्या तालावर पाय हलायचे . वार्‍याची कुजबूज , लाटांचा तांडव , पानांची सळसळ ही फक्त क्रियाविशेषणे वाटावी असा पिंड निदान माझा तरी नव्हता . नयनाच्या येण्याजाण्याच्या वेळेवर बसस्टॉपवर घालवलेले तासन्‌तास आठवले की आजही शहारल्यासारखं होतं . कामाच्या डेस्कवर बसलो असता खिडकीबाहेरचे आभाळ खुणवायचे . शहराच्या भर गर्दीत काम दामटत असताना रस्त्याच्या कडेच्या अमलताशला लगडलेली पिवळाई मोहरवायची . मंदारचा फोन आला की आजूबाजूला भिरभिरणार्‍या मुक्ताचे बोबडे बोल ऐकताना तिची प्रत्येक हालचाल जिवंत होऊन डोळ्यांपुढे यायची . सगळी कामं विसरून तिची ती बडबड ऐकत राहावीशी वाटायची . पुढे एकेक केस पिकत गेला . आता घराच्या व्हरांड्यात विद्यार्थ्यांचा चाललेला गोंगाट मनाला सुखावतो . घराजवळच्या बागेत काठी घेऊन फिरत

मात

संध्याकाळी पार्टीला जायचं ठरलं ,  तेव्हापासूनच राजीनं आपली तयारी सुरू केली होती .  आपल्या भल्यामोठ्या खोलीतील भिंतभर वॉर्डरोब तिनं उघडला .  गुडघ्याच्या जास्तीत जास्त वरपर्यंत असणारा ,  बॉक्स - प्लेट्स असणारा काळा - पांढरा स्कर्ट घालायचे तिने मनात पक्के केले .  त्यावर घालण्यासाठी शोल्डर्स उघडे ठेवणारा पांढरा टॉप तिने निवडला .  या स्कर्टमधून आपल्या सडसडीत ,  गोर्‍या मांड्या व वॅक्सिंग केलेले नितळ पाय खूप आकर्षक दिसतात याची तिला चांगलीच जाणीव होती .  टॉपमधून लक्षात येणारा छातीचा उभार आणि रूंद ,  खोलगट क्लिव्हेज किती जणांच्या छातीचे ठोके चुकवीत असे हेही तिच्या शार्प नजरेतून कधी सुटले नव्हते .  आजच्या पार्टीचे निमीत्त काय किंवा आपला पेहेराव त्याला साजेसा आहे का असा विचार चुकूनही राजीच्या मनाला शिवला नव्हता .  तिला आजची संध्याकाळ निखळ आनंदात फक्त घालवायची होती .  आपण सुंदर दिसावे ,  चार नजरा आपल्याकडे वळाव्या याचे अप्रुप असणं हे स्त्री स्वभावाचेच एक अंग आहे असे तिला ठामपणे वाटत होते .  तिच्याबरोबरच्या कितीतरी जणींनी ही मानसिकता पुरूषांनी त्यांच्या स्वार्थाकरिता आपल्या मनांमध्ये विकसित केली