Thursday, April 14, 2011

गाव

गावाची पाहिली पाहिली ओळख आठवते, ती "मामाच्या गावाला जाऊ या" म्हणत अवखळपणे मनात बागडणारी !
गेल्या ३-४ "पिढ्यापासून शहरात वसलेल्या माझ्या बालमनाला तेव्हा गाव या संकल्पनेनं कधीच भारलं नव्हतं।
सुट्टी त गावाला जाणं म्हणजे आपण जिथे राहतो, ते गाव सोडून दूसऱ्या गावी जाण। त्यामुळे मामाच्या गावानी
तर मन कधी हरखलं नाहीच, पण आपलं गाव कोणतं? हा प्रश्नही कधी पडलाच नाही। मामाचं गाव ते आपलं
गाव असा आपुलकीचा हक्क ही त्या कुठ ल्याश्या गावावर कधी वाटलाच नाही।
त्यानंतरच्या अधल्या -मधल्या वयात गाव भेटलं, ते हिंदी चित्रपट सृष्टितूनच ! मेरा गाँव मेरा देश, गोरी तेरा
गाँव बडा प्यारा किंवा हमरे गाँव कोई आयेगा यातच! मग ते छोटं खेडेवजा गाव, गाँव की चुलबुली छोरी, गाँव
के भोले-भाले लोग, गाँवके लहराते खेत, गाँव की गरिबी! अनुषंगानं आलेलं - गावात शिक्षण नाही, आरोग्य -
केंद्र नाही , जमीनदाराचे अत्याचार, काबाड-कष्ट करणारे हात आणि खपाटीला गेलेली पोटं! मग निरूपा रॉय
किंवा तत्सम आयांनी आप ल्या जितेन्द्र, अमिताभ, शशी कपूर किंवा तत्सम मुलांवर लादले या "बेटा, डॉक्टर
बनके अपने गाँव वापस आके अस्पताल खोलना किंवा टि चर बनके गाँव में अपने "पिता के नामसे एक इस्कुल
खोलना" प्रकारच्या अपेक्षावजा अट ! शिवाय गावाबाहेरचे तळ, तळयाकाठची उंच उंच झाडं, त्यातून डोकावणारा
चन्द्र, चंद्राकड़े अनिमीष नेत्रानी बघणारा राजकपूर आणि "आजा सनम मधूर चाँदनी में हम" म्हणणाऱ्या त्याच्याकडे तितक्याच अनिमीष नेत्रानी बघणारी प्रेयसी नर्गिस... गावाचं चित्र कसं संपूर्ण होतं मनात।
पण हे ही चित्रच राहिलं, आणि गावही परकंच राहिलं।
या सगळयात आपलं एक गाव असावं किंवा ते असतंच ही संकल्पना पण दूरच राहिली। नोकरीत असले ल्या वडिलांच्या बदलीच्या ठिकाणी पूर्ण कुटुम्बानं स्थलांतर करायच आणि जितकी वर्षे तिथे राहू, तितकी वर्षे तेच
आपले गाव ही संकल्पनाच मनात रुजून गेली।
पुढे पुढे साहित्याची ऒळख झाली, रूचि वाढली आणि पुन्हा गावं भेटली ती साहित्यकारांची! अनिल अवचटांचं
ऒतुर भेटलं, एलकुंचवारांचं पारवा भेटलं, आनंद यादवांचं कागल भेटलं, गौरी देशपांडेचं फलटण भेटलं। हळूहळू जे
कोडं आत्तापर्यंत पडलंच नव्हतं, ते छळ करायला लागलं। आप ल्याला गाव का नाही ? अवचटांसारखी ऒढ
आपल्याला कुठल्याच गावाबद्दल कशी नाही जाणवली? एलकुंचवारांना अस्वस्थ करणारंसं कुठलंच गाव आपल्या आजपर्यंतच्या आयुष्यात कधीच कसं डोकावलं नाही ? आनंद यादवांना वाटणारी तळमळ आपल्याला कुठल्याच गावाबद्दल कशी नाही वाटली? गौरीची फलटणशी असणारी जवळीक आपली कुठल्याच गावाशी का नाही ?
आत्तापर्यंतच्या भटकंतीत तसं पाहता कितीतरी गावं भेटली। गावं भेटणं ही एक मजेदार प्रक्रिया असते पहा -
काही काही गावं कशी कडकडून भेटतात। कितीतरी नुसतंच स्मित करून वेगळी होतात। काही खुणावतात, काही
लोभावतात, काही विसावा देतात. या सगया गावांनी ओढ लावली, पण ती परकीच राहिलीत।
आता मात्र 'गावा'नं पिच्छाच पुरवायला सुरुवात केली. अगदी निवांत असा एकांत मिळाल्यावर मी "गाव" या
संकल्पनेच्या गाभ्यातच शिरायचं ठरवलं। मामाच्या गावापासूनच सुरुवात केली। श्री.नां.नी वर्णिलेली कोकणातली
गावं आठवली। माडगूळकरांच्या माणदेशीच्या माणसांना त्यांच्या त्यांच्या गावातच भेटून आले आणि मनानं
कुठेतर हेरलं..
ही सगळी गावं शहरापासून दूर, दळण-वळणाच्या साधनांचा अभाव असणारी, क्वचित पिकाऊ माती असणारी,
क्वचित तलावांनी/ नदीनी वेढलेली, मंदिराच्या घंटांनी निनादत राहणारी, पक्षांच्या किलबिलाटानं उठणारी, फुला-
झाडांनी बहरलेली होती. त्यात ध्वनिप्रदूषण नव्हतं, वायूप्रदूषण नव्हतं, माणसा-माणसांत व्यवहार होते, पण
व्यवहारी पणा नव्हता, गर्दी नव्हती, भिती नव्हती। ही गावं शुद्ध भाषेच्या आग्रहापासून अणि शहरी पेहरावाच्या भपकार्यापासून मुक्त असणार्या माणसांची होती। नितळ मनांची होती, पारदर्शी भावनांची होती। निसर्गाच्या कुशीतच असल्यानं कृत्रीमतेपासून दूर होती। खोलवर ऋजलेली माया, ममता होती। नात्यांची नात्यांची तर होतीच होती, शेजारधर्माची ही होती। पहाटेच्या रम्यतेची होती, संध्याकाळच्या खिन्नतेची ही होती।
अरेच्चा, असं आहे तर हे ! उगाचच खंतावत होते मी. कारण या सगळया व्याख्यात चपखल बसणारं नसलं तरी ज्या शहरात मी राहते, ते "माझं" असणं ही मला पुरेसं आहेच की ! मला इथले प्रत्येक गल्ली-बोळ माहिती आहेत, मला इथली माणसं माहिती आहेत. माझ्याबरोबर ऒतुरला किंवा फलटणला फेरफटका मारणारे माझे
सगे-सोबती इथे आहेत. कधी आलंच मनात, तर नदीकाठी किंवा जंगलात जाऊन प्राण्या-पक्ष्यांमध्ये, झाडांमध्ये माझ्याबरोबर, माझ्याइतकेच रमणारे माझे सवंगडी ही इथे आहेत। मनाला प्रसन्न करणारी पहाट ही इथे आहे, नि शांत करणारी संध्याकाळ ही इथे आहे. अनिमिष नेत्रांनी ज्याच्याकडे बघावं, असा चंद्र ही इथे आहे। नसेल हे
शहर नैसर्गिक सौंदर्याच्या जवळ, पण मनाला जपणारी मनं तर आहेतच आहेत.
आत्ता मला माझ्या "गावा"ची ऒळख पटली। माझ्या गावाबद्दल जवळीक वाटली, तळमळ वाटली, ऒढ वाटली.
माझं शहरच माझं "गाव" बनून मला कडकडून भेटलं.

0 comments: