Thursday, April 14, 2011

बदल

बदल १
पाण्याचेच दव
पाण्याचीच वाफ
पाण्याचाबर्फ
पाण्याच्याच गारा
पाण्याच्याच बनल्यात घामाच्या धारा!!

बदल २
बीज अंकुरते
कोम्ब उगवतो
रोपटे तरारते
पालवी फूटते
फांदी न फांदी मोहोरते
फुला-फलांनी बहरला वृक्ष
पानगालिचाही तोच एक साक्ष!!

बदल
आपलीच बुद्धि
आपलेच मन
आपल्याच गरजा
आपलीच स्वप्न
आपले कर्तृत्व
आपल्याच बलात
बदल हा आलाच कुठून मूलात?


0 comments: